मुंबई, दि. 4 : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील
जिल्हाधिका-यांनी सादर केलेल्या प्रादेशिक पर्यटन विकास नियमावलीसंदर्भात नगररचना
संचालकांच्या अभिप्रायान्वये सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन विकास नियंत्रण नियमावलीस
तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) तथा सिंधुदूर्ग
जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे.
आज मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री रणजीत
पाटील यांच्या उपस्थितीत सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन विकास यंत्रणा नियमावलीबाबत
बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी
श्री. केसरकर बोलत होते.
श्री. केसरकर म्हणाले, प्रादेशिक आराखड्यात
नगरपरिषद/नगरपंचायत असा शब्द समाविष्ट करण्यासंदर्भातील सूचनेचा सकारात्मक विचार
करण्यात येईल. माहिती तंत्रज्ञान औद्योगिकीकरणासाठी परवानगी मिळावी यासाठी
प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मालमत्ता
हस्तांतरणासंदर्भात शुल्क अदा करण्यासंदर्भातील नियमांमध्ये सर्व नगरपंचायतीमध्ये
एकसुत्रीपणा असावा. यासंदर्भात अहवालाअंती निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी
यावेळी सांगितले.
या बैठकीस सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील संबंधित
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment