मुंबई, दि. 4 : तिलारी प्रकल्पाच्या पाच हजार ६०० हेक्टर क्षेत्रातील
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी मिळावे, यासाठी कृषी व सिंचन
विभागाने योजना आखून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री
(ग्रामीण) तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज सांगितले.
श्री. केसरकर म्हणाले, उजवा तीर, डावा तीर, बांधा हे प्रांत
प्रकल्पाअंतर्गत येत असून, संबंधित क्षेत्रातील सर्व गावांना या योजनेचा फायदा
होईल या पद्धतीने काम करावे. उपलब्ध निधीचा योग्य वापर करून जास्तीत जास्त
शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठीची योजना करावे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाल्यास
उत्पन्न दुप्पट होईल. सूक्ष्म सिंचन सर्व शेतकऱ्यांना मोफत असून, यामध्ये सौर ऊर्जा
पंपाचा उपयोग केल्यास जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. त्यासंदर्भातील अहवाल तयार
करून तातडीने कार्यवाही करावी, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.
आज मंत्रालयात
नव्याने प्रस्तावित लघु पाटबंधारे प्रकल्प व जिल्ह्यातील सूक्ष्म
सिंचनासाठीचे प्रस्तावित प्रकल्पा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या
बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता मकरंद
मॅकेल,
राजेश
धागतोडे,
जैन
सिंचनचे मधुकर फुके आदीसमवेत संबंधित अधिकारी उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment