Tuesday, 4 September 2018

सहायक ग्रंथालय संचालक कार्यालय येथे दुर्मिळ ‘लोकराज्य’ अंकांच्या प्रदर्शनाचे आयोजन

         नागपूर, दि. 4 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर विभागीय कार्यालय, विभागीय माहिती केंद्र व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने सहायक ग्रंथालय संचालक कार्यालय, प्रशासकिय इमारत क्र-2. 5 वा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे दि. 5 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 वा दुर्मिळ ‘लोकराज्य’ मासिकाच्या अंकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घान सहायक ग्रंथालय संचालक मीनाक्षी कांबळे यांच्या हस्ते होणार असून हे प्रदर्शन सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 दरम्यान वाचकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 
  या प्रदर्शनामध्ये 1964 पासूनचे विविध विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध असतील. यामध्ये प्रामुख्याने बालगंधर्व विशेषांक, शाह महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर 1990), महात्मा गांधी, साने गुरुजी,  यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख,  स्वातंत्र्य दिनअखिल भारतीय साहित्य संमलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांकनिवडणूकशेती, सिंचन, बेटी बचाव संदर्भातील  विशेषांक,शिक्षण,वनपर्यटन यासह विविध विषयांना वाहिलेले विशेषांकही आहेत. दुर्मिळ ‘लोकराज्य’ मासिक अंकांच्या प्रदर्शनाचा लाभ वाचकांनी घेण्याचे आवाहन विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांनी केले आहे.
-----000-----
केशव करंदीकर

No comments:

Post a Comment