मुंबई,
दि. १० :
इरई नदी किनारा विकास आराखडा तयार करण्यात आला असून यातील बरेच काम हे म्हाडा
मार्फत करण्यात येणार आहे, म्हाडाने या कामास वेग द्यावा, अशा सूचना अर्थमंत्री तथा
चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या.
मंत्रालयात
इरई रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सर्व
संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
इरई नदीवर
३.५ कि.मी लांबीची रिटेनिंग वॉल व १ कि.मी लांबीपर्यंत सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. ही सर्व कामे करतांना ती तर्कावर आणि तंत्रज्ञानाच्या भक्कम पृष्ठभूमीवर
आधारित असावीत असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, ही कामे करताना नदीची फ्लड
लाईन विचारात घेतली जावी. सर्व तांत्रिक आणि अत्यावश्यक बाजू तपासल्या
जाव्यात. या नदीवर धानोरा, आमडी, आर्वी धानोरा येथे
बॅरेजेस बांधण्यात येणार आहेत, त्यासाठी केंद्र सरकारच्या पॅनलवर असलेल्या व्हॅपकॉस
या कंपनीचे सहकार्य घेण्यात यावे अशा सूचनाही त्यानी यावेळी केल्या.
००००

No comments:
Post a Comment