Monday, 29 October 2018

गेल्या पंधरा दिवसात 100 कोटींच्या औषध व उपकरण खरेदीचे आदेश निर्गमित

मुंबई, दि. 29 : आरोग्य सेवा संचालनालय तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांच्यासाठी लागणाऱ्या  सुमारे 100 कोटी निधीची औषधे व उपकरणे यांचे खरेदी आदेश गेल्या केवळ 15 दिवसांत हाफकिन अंतर्गत येणाऱ्या खरेदी कक्षाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. आरोग्य सेवा संचालनालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या रुपये 336.68 कोटी पैकी रुपये 83.43 कोटी खर्च झाले आहेत. तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या रुपये 239.05 कोटी अनुदानापैकी रुपये 0.95 कोटी खर्च झाले आहेत, अशी माहिती  हाफकिन महामंडळाने दिली आहे.
शासनाला आवश्यक असणाऱ्या औषध खरेदीसाठी 26 जुलै, 2017 च्या शासन निर्णयानुसार हाफकिन महामंडळामार्फत 15 ऑगस्ट 2017 पासून खरेदी कक्ष कार्यान्वित झाला आहे. हा कक्ष हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या आवारातच आहे.
आतापर्यत या कक्षासाठी 47 अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा प्रत्यार्पित झालेल्या आहेत. या कार्यालयास रुपये 980.87 कोटी रक्कमेच्या 1237 निविदा प्राप्त झालेल्या आहेत. त्यापैकी रुपये 816.63 कोटी रक्कमेच्या 1037 निविदा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. यापुढे 200 निविदा टप्प्याटप्याने प्रसिध्द करण्यात येणार आहेत. निविदा मान्यता समितीच्या 25 बैठका झालेल्या आहेत. एकूण रुपये 390.82 कोटी इतक्या रक्कमेचे 513 पुरवठा आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. पुढील 1 महिन्यात 206 पुरवठा आदेश देण्यात येतील, त्याची किंमत रुपये 205 कोटी आहे.
हिमोफिलियाच्या औषधांची खरेदी
राज्यातील हिमोफिलिया रुग्णांसाठी आवश्यक असणारे औषधाची खरेदीची मागणी आरोग्यविभागाने केली होती. त्यासाठी लागणाऱ्या चार प्रकारच्या औषधीच्या खरेदीचे आदेश 11 जुलै 2017 रोजी देण्यात आले होते. त्याचा सर्व पुरवठा पूर्ण झाला आहे. त्यांनतर पुढील औषधांची मागणी 15 ऑक्टोबर, 2018 रोजी नोंदविण्यात आली. यासाठी खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरु आहे.
यापूर्वी आरोग्य विभागाने मागणी रद्द केल्याने हिमोफिलियाच्या औषधांची खरेदीसाठी राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.
                                                                               ००००

No comments:

Post a Comment