Monday, 29 October 2018

'जय महाराष्ट्र' मध्ये वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार

   मुंबई, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ' महाराष्ट्र वस्तू व सेवा कर : फलनिष्पत्ती' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक शैलेश पेठे यांनी घेतली आहे.
वस्तू व सेवा कर कायद्याची अमंलबजावणी १ जुलै २०१७ पासून सुरू झाली त्यामुळे एक देश,एक बाजार एक कर अमंलात आलेली संकल्पना, कर चुकवेगिरीला आळा, जीएसटीची सद्यस्थिती, या करप्रणालीच्या अमंलबजावणीमुळे होणारे फायदे, अमंलबजावणी करताना घेतले गेलेले महत्वपूर्ण निर्णय, प्रभावी करवसूली याबाबत श्री. मुनगंटीवार यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
                                                                       ००००

No comments:

Post a Comment