Monday, 29 October 2018

जप्त पशुधन लिलाव 2 नोव्हेंबरपासून

नागपूर, दि. 29 :  ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या मुदत ठेवी मुदतीनंतर परत करण्यास कसूर केल्यामुळे नागपूर निवासी रविराज इन्व्हेस्टमेंट ॲन्ड स्ट्रॅटेजिसचे संचालक राजेश जोशी व इतर त्यांचेविरुध्द धंतोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींची मालमत्ता महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई  यांचे कडे जप्त करण्यात आली आहे.
प्रकरणातील जप्त पशुधनाची विक्री दि. 2 नोव्हेंबर रोजी मौजा तोंडाखैरी , ता. कळमेश्वर येथे व दि. 3 नोव्हेंबर रोजी मौजा बोरगांव (कोंढाळी) येथे दुपारी 12 वाजता उपविभागीय अधिकारी, नागपूर शहर तथा सक्षम प्राधिकारी यांचेकडून जाहीर लिलावाव्दारे करण्यात येणार आहे. 
जप्त मालमत्तेची (पशुधनाची) यादी व सविस्तर तपशील, अटी व शर्ती इत्यादी बाबातची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ Nagpur.nic.in यावर Latest Updates  मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  तरी लिलावात भाग घेऊ इच्छुकांनी उपरोक्त संकेतस्थळावर जाऊन लिलावाची उद्घोषणा व लेखी नोटीस पाहून भाग घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी उपविभागीय अधिकारी, नागपूर शहर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी शिरीष पांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                                          ****

No comments:

Post a Comment