नागपूर, दि. 29 : प्रादेशिक परिवहन नागपूर( शहर) कार्यालयाकडून दिनांक 1
ते 15 ऑक्टोबर 2018 दरम्यान वायूवेग
पथकामार्फत अवैधपणे शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम
राबविण्यात आली. ही मोहीम प्रादेशिक
परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या
मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली असून या मोहिमेत 275 विद्यार्थ्यांची वाहतूक
करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली.
110 दोषी वाहनांना तपासणी
प्रतिवेदन जारी करण्यात आले. यात 105 स्कूल बस व 5 विद्यार्थ्यांची वाहतूक
करणाऱ्या अवैध वाहनांचा समावेश आहे. या
अवैध वाहनांपासून 2.01 लक्ष रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ही कारवाई वायूवेग
पथकातील तपासणी अधिकारी मोटार वाहन निरीक्षक जमदाडे, सौरव पाटील व सहा. मोटार वाहन
निरीक्षक श्री. मुघल यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
***
No comments:
Post a Comment