श्रीक्षेत्र
मोझरीच्या विकासासाठी
१५०
कोटींचा विकास आराखडा मंजूर
मुंबई,
दि. २९ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या
जन्मतिथीस शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ श्रीक्षेत्र मोझरी, जिल्हा अमरावती येथे विविध विकास कामे
करण्यासाठी १५० कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर
करण्यात आला आहे अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
श्री.
मुनगंटीवार म्हणाले, चालू वित्तीय वर्षात ८ ऑगस्ट २०१८ रोजी ५३ मोठ्या बांधकामासाठी ९ कोटी ६५ लाख रुपयांचा
निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त, अमरावती यांना आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून
देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याप्रमाणे आता पुन्हा 5 कोटी 29 लाख 12 हजार रुपयांचा निधी मुलभूत सुविधा
निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नियोजन विभागाने यासंबंधीचा शासन
निर्णय ही २६ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केला आहे. हा शासननिर्णय महाराष्ट्र
शासनाच्या www.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध
असून 5 कोटी २९ लाख रुपयांमध्ये ५३ मोठी बांधकामे करण्याचे नियोजित आहे,
अशी माहिती ही त्यांनी दिली.
००००
No comments:
Post a Comment