मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास
कार्यक्रमात महात्मा गांधीजींच्या १५०
व्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या
‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या ग्रंथातील श्राव्य लेख प्रसारित होणार आहे.
आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. ३०, बुधवार दि. 31 ऑक्टोबर आणि गुरूवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका
श्रीमती पुनम चांदोरकर यांनी निवेदन केले आहे.
माहिती
व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त ‘महाराष्ट्र
आणि महात्मा गांधी’ या शीर्षकाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
या ग्रंथातील न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी लिहिलेले 'महाराष्ट्र आणि गांधीजी' या लेखात महात्मा गांधीजींचे महाराष्ट्रावरील
प्रेम, महाराष्ट्रातील जनतेचा चरखा व खादी
वरील विश्वास तसेच महाराष्ट्रातून महात्मा गांधीजी यांच्या स्वराज्य या संकल्पनेची
सुरुवात कशाप्रकारे झाली याबद्दल माहिती
देण्यात आली आहे. श्रीमती संपदा जोगळेकर
-कुलकर्णी यांनी या लेखाचे वाचन केले आहे.
००००

No comments:
Post a Comment