नागपूर, दि 28 : अटल आरोग्य
महाशिबिराच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचारासह आवश्यक
असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करुन देणार असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत, असे शिबीर
नियमितपणे आयोजित करावे यामुळे गरजूंना आरोग्यविषयी सेवांचा एकाच छताखाली लाभ घेता
येणार असल्याचे मत आरोग्य महाशिबीरात येणाऱ्या प्रत्येक गरजू लाभार्थ्यांनी व्यक्त
केले.
सेंट्रल
बाजार रोड वरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात अटल आरोग्य
शिबीराचे आयोजन करण्यात आले.
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघात
गरीब व गरजू नागरिकांसाठी ‘अटल आरोग्य हेल्थ मिशनला’ आजपासून सुरुवात झाली. वर्षभर
हे मिशन चालणार असून यातून अनेक प्रकारच्या व्याधींवर उपचार करण्यात येणार
असल्याची माहिती मिळताच रामेश्वरी येथील रहिवासी कुमार कोथळकर (वय 23) या तरुणाने शिबीरात
रक्त तपासणी केली असता त्याला टू टाईप सिकल
असल्याचे निदान झाले. आपण वरुन सुदृढ दिसत असलो तरी अंतरिम आजाराची आपल्याला जाणीव
नसते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती बिनधास्त जीवन जगत असतो. परंतु या शिबीराच्या
माध्यमातून निदान झाल्यानंतर मला ही जाणीव झाली
की आरोग्याविषयी जागरुक राहणे किती महत्त्वाचे असते. शिबीरात तपासणी केल्यानंतर
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता पुढील उपचाराची प्रक्रिया सुरु ठेवणार असल्याचे
कुमार कोथळकर यांनी सांगितले.
नेत्र तपासणीसाठी आलेले रामलाल गडपायले
वय वर्षे 70 यांच्या डोळ्याच्या नसेला रक्त पुरवठा होत नसल्यामुळे त्यांचा एक डोळा
दृष्टीहीन झालेला आहे. त्याला ‘पेट्रीक न्युरोपॅथी’ असे वैद्यकीय भाषेमध्ये बोलल्या जाते. उच्च रक्तदाब
किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो तसेच अनेक दिवसांपासून
कुठल्याही व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळून येतो. परंतु
याला काचबिंदू असेही म्हटल्या जाते. परंतु या आजारावर कुठलाही उपचार देशात उपलब्ध
नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे रामलाल यांना तात्पुरता औषधोपचार करण्यात
येईल, असेही त्यांना डॉक्टरांनी सुचविले आहे.
एकात्मता नगर येथे राहणाऱ्या शोभा
इंगोले या डोळे तसेच गुडघ्याच्या आजारावरील उपचारासाठी आल्या. याआधी झालेल्या
तपासणी शिबीरामध्ये त्यांनी प्राथमिक तपासणी केली असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
प्राथमिक तपासणीनंतर दुय्यम तपासणीसह डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेणार आहे.
या शिबीराच्या माध्यमातून गुडघ्याच्या आजारावरील महागडे उपचार करण्याची शक्ती
नसल्याने जो शारिरीक त्रास सहन करत होते. तो त्रास आता सहन
करावा लागणार नसल्याचे सांगून असे शिबीर नियमितपणे घ्यावे, असेही त्या यावेळी
म्हणाल्या.
*****
No comments:
Post a Comment