Wednesday 31 October 2018

‘मॉस्को - मुंबई थेट विमानसेवेमुळे व्यापाराला चालना मिळेल’

रशियाच्या नवनियुक्त व मावळत्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, दि. 31 : रशियाचे नवनियुक्त वाणिज्यदूत अलेक्सी सुरोवत्सेव यांनी मावळते वाणिज्यदूत आंद्रेई झिलत्सोव यांचेसमवेत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची बुधवारी राजभवनमुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
पुढील वर्षापर्यंत रशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग ही दोन मोठी शहरे मुंबईशी थेट विमानसेवेने जोडली जाणार असून त्यामुळे व्यापारपर्यटन आणि विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या फळांच्या निर्यातीला चालना मिळेल असे वाणिज्यदूतांनी सांगितले.
रशिया आणि भारत यांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असल्याचे नमूद करून संरक्षणसामरिक सहकार्यउर्जा यांसह विविध क्षेत्रात घनिष्ठ सहकार्य आहे. उभय देशांमधील व्यापार संबंध वाढल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल आणि उभय देशांना त्याचा फायदा होईल असे वाणिज्यदूतांनी सांगितले. आगामी काळात रशियातील विविध शहरांमधून उद्योजकांचे एक मोठे शिष्टमंडळ दिल्ली तसेच मुंबई भेटीवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पायाभूत सुविधापर्यटन विकास आणि फलोत्पादन या क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी असून विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी देवाण घेवाण देखील व्हावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. मावळते वाणिज्यदूत आंद्रेई झिलत्सोव यांनी त्यांना तीन वर्षाच्या कार्यकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.
००००

No comments:

Post a Comment