Wednesday 31 October 2018

रेशनवर मिळणार साखर, चणा व उडीद डाळ - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट

मुंबईदि. 31 : सर्व सामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्यातील सुमारे 1 कोटी 23 लाख प्राधान्य कुटुंबांना प्रती कुटुंब 1 किलो साखर 20 रुपये दराने वाटप करण्यात येणार आहे. तरप्रती शिधापत्रिका चणाडाळ 1 किलो आणि उडीद डाळ 1 किलो किंवा दोन्हीपैकी एक डाळ 2 किलो याप्रमाणे वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
            श्री. बापट यांनी सांगितलेलाभार्थ्यांना नोव्हेंबरच्या अन्नधान्य  वाटपासोबत ई पॉस द्वारे साखर घेता येणार आहे. यासाठी राज्यात 39 कोटी किंमतीची 1 लाख 22 हजार 947 क्विंटल साखर उपलब्ध करुन दिली आहे. या वितरण प्रक्रियेत राशन दुकानदारांना 1.50 कोटी रुपयांचे कमिशन मिळणार आहे.  चणाडाळ प्रतिकिलो 35 रु. व उडीदडाळ प्रतिकिलो 44 रु. या दराने रेशन दुकानावर उपलब्ध होणार आहे. 
राज्यात माहे नोव्हेंबर 2018 पासून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना केंद्रशासनाकडून अनुदानित दराने  प्राप्त होणाऱ्या  चणाडाळ व उडीदडाळीचे वाटप सुरु होणार आहे. राज्यात सुमारे 25 लक्ष अंत्योदय व 1 कोटी 23 लक्ष प्राधान्य कुटुंबास याचा लाभ मिळणार असून एकूण 7 कोटी 16 हजार लाभार्थी राज्यभरात आहेत.
धान खरेदीस सुरुवात-
राज्यात सन 2018-19 या चालू हंगामात 450 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले असून त्यापैकी सद्यस्थितीत 114 केंद्रावर प्रत्यक्षात धान खरेदी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. बापट यांनी दिली. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी म्हणून रु. 200 प्रति क्विंटल संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट जमा करण्यात आले आहे. हंगाम 2016-17 मध्ये प्रोत्साहनपर राशीसाठी रु. 63.50 कोटी व हंगाम 2017-18 करिता रु. 45.78 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे.
विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्यांची खरेदी ऑनलार्ईन पध्दतीने करण्यात येते. हंगाम 2017-18 मध्ये सुमारे 1 लाख 11 हजार 564 इतक्या शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्याची खरेदी करण्यात आली आहे.   हंगाम 2016-17 मध्ये शेतकऱ्याकडून सुमारे 610.35 कोटी व हंगाम 2017-18 मध्ये सुमारे 400.68 कोटी इतक्या रकमेचे धान खरेदी करण्यात आले.
            हंगाम 2014-15 पासून केंद्र शासनाच्या 10 रु. प्रती क्विंटल या धान भरडाई दरांव्यतिरिक्त 30 रु. प्रती क्विंटल अतिरिक्त भरडाई दर  राज्य शासनाकडून मंजूर त्यामुळे धान भरडाईच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य शासनाकडून हंगाम 2016-17 पासून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत विकेंद्रीत खरेदी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पूर्वी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान हे भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI)  जमा करण्यात येत होते. DCPयोजनेअंतर्गत आता थेट राज्य शासनाकडून लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वितरित करण्यात येते. त्यामुळे धान उत्पादक जिल्हयांतील तयार होणाऱ्या तांदळाची  तात्काळ विल्हेवाट लावता येणे राज्य शासनास शक्य झाले आहे. परिणामी यापूर्वी योजना राबवितांना होणारा कालापव्यय टाळता आला आहे.
सणासुदीच्या दिवसात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई
            दिवाळी हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. या दिवसात आपल्याकडे गोडधोड खाद्यपदार्थाची रेलचेल असते. या काळात मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थांना मोठया प्रमाणात मागणी असते. ही वाढती मागणी लक्षात घेताहे पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याकडे भेसळीचे प्रमाण  वाढण्याची शक्यता असते. या भेसळयुक्त पदार्थामुळे दिवाळीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच खवामावा याची आवक बाहेरच्या राज्यातून ट्रॅव्हल्सरेल्वे यातून होताना आढळून येते म्हणून याबाबत सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेवून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. बापट यांनी दिली.
         श्री. बापट पुढे म्हणाले,  राज्यात दिवाळी व इतर सणानिमित्त भेसळयुक्त बर्फीखवा/मावातेल तूप या अन्नपदार्थावर धाड टाकून हे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत 21 हजार 225 कि.ग्रॅ. सुमारे 35 लाख किंमतीचा भेसळयुक्त खवा/मावा जप्त करण्यात आला आहे. तसेच या दरम्यान 1 लाख 55 हजार 652 कि.ग्रॅ. सुमारे दीड कोटी किमतीचे भेसळयुक्त वनस्पती तूप/खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे तसेच भेसळयुक्त मिठाई  46 हजार 976 कि.ग्रॅ. याची बाजार किंमत सुमारे 37 लाख 77 हजार 95 जप्त करण्यात आली. प्रशासनाच्या पुणे कार्यालयाने अहमदाबाद-गुजरात येथून प्रवासी वाहनातून स्पेशल बर्फी हा अनियंत्रित तापमानामध्ये साठा करुन आरोग्यास घातक अशा परिस्थितीमध्ये साधारण 24 तासापेक्षा जास्त कालावधीत वाहतूक केलेला  होता. यावर कारवाई करुन एकूण 17 हजार 552 कि. ग्रॅ. असा जवळजवळ 31 लाख 82 हजार 432 रुपये एवढया किंमतीची बर्फी जप्त करण्यात आली.
          धाडीसोबत जनसामान्यांकरिता प्रबोधनाचे कार्य केले जात आहे. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून  ईट राईट इंडिया ही चळवळ नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी स्वास्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये स्वास्थ मेळावे प्रभातफेरी सांस्कृतिक कार्यक्रमपोस्टर स्पर्धा इ. कार्यक्रमाचे संपूण देशात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. स्वास्थ भारत यात्रेतून आरोग्यदायी खास्वच्छ खानिरोगी रहा हा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्यात येत आहे. हा स्वास्थ भारत यात्रेचा  शुभारंभ  जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने करण्यात आला आहे.
          भेसळयुक्त पदार्थाच्या माहितीसाठी अन्न व औषध प्रशासनाने  1800222365 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला असून नागरिकांना अशा काही भेसळयुक्त पदार्थाची माहिती असल्यास या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही यावेळी श्री.बापट यांनी केले.
००००

No comments:

Post a Comment