Tuesday, 27 November 2018

राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल, हॅन्डबॉल स्पर्धा 1 डिसेंबरपासून


* जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला आढावा
नागपूर, दि.27 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेच्या वतीने दिनांक 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल व हॅन्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित पाच दिवसीय स्पर्धेत राज्यातील 1300 खेळाडू सहभागी होणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी स्पर्धेच्या नियोजनाविषयी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव चेतन महाडिक, श्रीधर गाडगीळ, जिल्हा हॅन्डबॉल संघटनेचे सचिव सुनील भोतमांगे, अशोक साखरकर, उपशिक्षणाधिकारी आशा मेश्राम, तालुका क्रीडा अधिकारी पवन मेश्राम, क्रीडा अधिकारी त्रिवेणी बान्ते, क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे आदी उपस्थित होते.
नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा 19 वर्षे वयोगटातील मुले व मुलींमध्ये तर हॅन्डबॉल स्पर्धा 17 19 वयोगटातील मुले व मुलींमध्ये होणार आहे. या स्पर्धांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातून येणाऱ्या 1300 खेळाडूंची निवास, भोजन तसेच अन्य व्यवस्था क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. याकडे विशेष करुन लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
***** 

No comments:

Post a Comment