मुंबई, दि. 1 : उच्च व तंत्र
शिक्षण विभागामार्फत गुणवंत मुलामुलींना परेदशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
देण्यात येणार आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विदयार्थ्यांसाठी उच्च
शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही योजना उच्च व तंत्र शिक्षण
विभागाअंतर्गत गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
करणे या नावाने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राबविण्यात
येणार आहे.
संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्र
अर्जासोबत अपलोड करणे यासाठी 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2018 (सायंकाळी 5
वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत 10
नोव्हेंबरपर्यंत (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) वाढविण्यात आली
आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे
साक्षांकित प्रतीसोबत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात
सादर करणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान
व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय तर व्यवस्थापन,
अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्त्र आणि औषण निर्माणशास्त्र
अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षणचे विभागीय कार्यालय यांना 17
नोव्हेबर 2018 (सायंकाळी 5
वाजेपर्यंत)जमा करणे आवश्यक आहे.
इच्छुक विदयार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या
संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे, आवश्यक
प्रमाणपत्रे/कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर
कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. ऑनलाईन भरलेल्या
अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसोबत अर्ज
संबंधित कोणत्याही विभागीय कार्यालयात मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी सादर करणे
आवश्यक असणार आहे.
००००
No comments:
Post a Comment