Friday, 2 November 2018

जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील 7 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी - बबनराव लोणीकर


            मुंबई, दि. 2 : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील पाणी पुरवठा योजनेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 7 कोटी 40 लाख रुपये किमतीची प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            श्री. लोणीकर म्हणाले, टेंभुर्णी गावाच्या लोकसंख्येतील वाढ वेगाने होत असल्याने अस्तित्वातील योजना अपुरी पडत असल्याने खडकपूर्णा मध्यम प्रकल्प उद्भव धरुन नवीन योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेचा दरडोई खर्च जास्त असूनही लोकहितास्तव या योजनेला मान्यता देण्यात येत आहे.
            मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत रु. 4 कोटी 74 लक्ष किंमतीच्या आराखडयाला मान्यता दिलेली होती, परंतु पाण्याची गरज व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सदर अंदाजपत्रकात वाढ होऊन या योजनेची किंमत 7 कोटी 40 लक्ष झालेली आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत करण्यात येणार असून लवकरच निविदा प्राप्त करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. लोणीकर यांनी दिली.
000

No comments:

Post a Comment