नागपूर दि.06 : प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शहरातील मालवाहू तसेच प्रवासी वाहनांची
नियमित तपासणी केली जाते. यामध्ये विविध नियमांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये
क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईतून
प्रादेशिक परिवहन विभागाने सर्वाधिक 93 लक्ष 91 हजार रुपयांची दंडात्मक वसुली केली
आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने स्कुल बस तपासणी, दुचाकी
मोहिम तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राबाबत विशेष तपासमी मोहिम राबविली.
आर्थिक वर्ष 2018-19 अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत क्षमतेपेक्षा
अधिक भार वाहून नेणाऱ्या वाहन चालक तसेच मालकांकडून सर्वाधिक दंड वसूल करण्यात
आला. एप्रिल ते जूलै या कालावधीत 95 वाहनांवरील कारवाईतून 22 लक्ष 53 हजार तसेच
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत 241 वाहनांकडून 71 लक्ष 38 हजार रुपये वसुल करण्यात
आले.
स्कुल बस तपासणीमध्ये 77 बस चालकांकडून एप्रिल ते जूलैपर्यंत 1 लाख 78 हजार
तसेच ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत 198 बसेसकडून 4 लक्ष 52 हजार रुपये, 327 दुचाकी
वाहनांवरील कारवाईतून एप्रिल ते जूलैपर्यंत 1 लक्ष 93 हजार तसेच 280 कडून ऑगस्ट ते
ऑक्टोबर या कालावधीत 1 लक्ष 29 हजार रुपयांची दंडात्मक वसूली करण्यात आली. योग्यता
प्रमाणपत्र नसणाऱ्या 82 वाहनाचालकांकडून एप्रिल ते जूलैपर्यंत 7 लक्ष 85हजार तसेच
157 वाहन चालकांकडून ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत 1 लक्ष 59 हजार रुपयांच्या
दंडात्मक राशीची वसुली करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी
नागपूर शहर यांनी दिली आहे.
कारवाई दरम्यान गैरसरकारी संघटनांमार्फत आमिष देण्याचा किंवा प्रलोभने
देण्याच्या प्रयत्नांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment