Tuesday, 6 November 2018

कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांचा माहे नोव्हेंबरचा धान्य पुरवठा जाहीर

            नागपूर, दि. 06 : अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत माहे नोव्हेंबर 2018 करिता शिधावस्तूचे धान्य उपलब्धतेनुसार वितरण करण्यात येणार आहे.
प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना दोन रुपये प्रमाणे प्रति व्यक्ती 3 किलो गहू, तीन रुपयेप्रमाणे 2 किलो तांदूळ, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति पत्रिका दोन रुपये प्रमाणे 15 किलो गहू, तीन रुपये प्रमाणे 20 किलो तांदूळ देण्यात येईल. अंत्योदय शिधापत्रिकाधारकाकरिता 20 रुपये किलो दराने 1 किलो साखरेचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
                                                                      *****

No comments:

Post a Comment