Wednesday, 28 November 2018

चीनच्या युनान प्रांताच्या शिष्टमंडळाने घेतली सभापती व अध्यक्षांची भेट



मुंबईदि. 28 : चीनमधील युनान प्रांताच्या सीपीसीसीच्या चेअरमन ली जिंग यांनी शिष्टमंडळासह आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली. महाराष्ट्र व युनान प्रांतामध्ये व्यापारी व सांस्कृतिक संबंध दृढ व्हावेतअशी यावेळी इच्छा व्यक्त केली.
            श्रीमती जिंग यांच्यासह चीनचे मुंबईतील वाणिज्य दूत टँग गौकाईसीपीसीसीच्या युनान प्रांताचे संशोधन अधिकारी टॅन यायूयानपरराष्ट्र कार्यालयातील उपमहासंचालक हाऊ कॉनसांस्कृतिक व ऐतिहासिक दस्तावेज समितीचे हुंग लिक्सिनउपाध्यक्षा वांग हुईपिंगसदस्य झांग जुइंजलि लि आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी संसदीय कार्यमंत्री गिरीष बापटआमदार शरद रणपिसेनिलम गोऱ्हेविधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसेउपसचिव विलास आठवले आदी यावेळी उपस्थित होते.   
विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल माहिती देऊन श्री. नाईक निंबाळकर म्हणालेचीनमधील युनान प्रांत हा भारताला लागून आहे. महाराष्ट्र व युनान प्रांतात सांस्कृतिकपर्यटन क्षेत्रात देवाणघेवाण व्हावी. तसेच राज्यात चित्रपट क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या क्षेत्रातही दोन्ही प्रांतात सहकार्य होईल.
            श्रीमती जिंग म्हणाल्यामहाराष्ट्र हे भारतातील प्रगतीशील राज्य आहे. महाराष्ट्र व मुंबईचा देशाच्या विकासात मोलाचा वाटा आहे. आर्थिक बरोबरच कलासांस्कृतिक क्षेत्रातही राज्य अग्रेसर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास युनान प्रांत उत्सुक आहे. तसेच पुढील वर्षी युनान प्रांतात होणाऱ्या जागतिक व्यापार व गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्राने सहभागी व्हावे.
आमदार श्रीमती गोऱ्हे व श्री. रणपिसे यांनी चीन दौऱ्यातील आठवणी सांगितल्या. यावेळी शिष्टमंडळाने सभागृहाच्या अतिथी कक्षात उपस्थित राहून कामकाज पाहिले.
                                                                           ०००

No comments:

Post a Comment