Wednesday, 28 November 2018

सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीची खात्री करूनच फॉरवर्ड करावे – पराग जैन


मुंबईदि. 28 : व्हॉटसअपट्विटर सारख्या समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) येणारी सर्वच माहिती ही खरी नसतेअशा खोट्या माहितीछायाचित्रांमुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे समाज माध्यमांवर येणाऱ्या माहितीचा बातमीचा सोर्स म्हणून उपयोग करू नये व त्याची खात्री केल्याशिवाय ती फॉरवर्ड करू नये. तसेच छायाचित्रेव्हिडिओ यांची खातरजमा करण्यासाठी इंटरनेटवर अनेक सोयी उपलब्ध असल्याची माहिती सोशल मीडिया हॉक्स स्लेयर (Social Media Hoax Slayer) या संकेतस्थळाचे संस्थापक पंकज जैन यांनी आज येथे दिले.
                समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या फेकन्यूजची सत्यता कशी पडताळून पहावीयासंदर्भात आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी श्री. जैन यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. श्री. जैन यांची www.smhoaxslayer.com हे संकेतस्थळ सोशल मीडियावर व्हायरल होणारी माहितीछायाचित्रे व व्हिडिओची सत्यता पडताळून त्याबद्दल माहिती देत असते. भारतातील अशा प्रकारचे हे पहिले संकेतस्थळ आहे.
श्री. जैन म्हणालेसध्या मोबाईलचा इंटरनेट डेटा स्वस्त झाल्यामुळे सर्वसामान्यांकडे स्मार्टफोन आला आहे. व्हॉटसअपट्विटर सारख्या समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. अनेक जण व्हॉटसअपवर आलेल्या माहितीची खात्री न करता ती दुसऱ्यांना पाठवित असतात. यामुळे समाजात गैरसमज पसरण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनीही आपल्याला आलेल्या पोस्टची खात्री करूनच ती खरी आहे का पाहून पुढे पाठवावी. ट्विटरवरही मोठ मोठ्या व्यक्तिंच्या नावे अनेक खाती बनावट आहेत. त्यामुळे व्हॉटसअपट्विटरचा वापर करताना विचार करून माहितीची देवाणघेवाण करावी.
                आज इंटरनेटवर गुगलच्या मदतीने खोटी छायाचित्रेव्हिडिओ ओळखता येतात. एखादे छायाचित्र कधी काढले आहेतो इंटरनेटवर यापूर्वी कधी अपलोड झाला आहेकोणत्या ठिकाणचे आहे आदी माहिती गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्चद्वारे पडताळता येते. त्याचप्रमाणे व्हॉटसअपवर आलेला व्हिडिओची खात्री करता येते. तसेच मेटाटॅगच्या मदतीनेही छायाचित्राची माहिती मिळविता येतेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.
                यावेळी उपसंचालक (प्रकाशने) सुरेश वांदिलेउपसंचालक (प्रशासन) गणेश रामदासीउपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारीकर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) (समाज माध्यम) किशोर गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात सोशल मीडिया हॉक्स स्लेयर या संकेतस्थळासंदर्भात माहिती दिली. वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) मीनल जोगळेकर यांनी आभार मानले.
                                                                 ०००

No comments:

Post a Comment