मुंबई, दि. 29 : वर्धा जिल्ह्यातील
हिंगणघाटचे पशू वैद्यकीय रुग्णालय सुरु असून जनावरांना वेळेत उपचार मिळत आहेत.
तसेच सर्व रिक्त पदे भरली असल्याचे पशू संवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जून
खोतकर यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य समीर कुणावार यांनी हिंगणघाटचे पशु वैद्यकीय
रुग्णालय बंद असल्याबाबत तसेच रिक्त पदे भरली नसल्याबाबतचा प्रश्न विचारला होता.
या प्रश्नावर उत्तर देताना श्री. खोतकर म्हणाले, पशू वैद्यकीय रुग्णालयातील पशूधन
विकास अधिकारी आणि पशूधन पर्यवेक्षक ही दोन पदे मे, 2018
मध्ये भरली आहेत. तसेच या दवाखान्यात पशू वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या जनावरांवर
वेळेत उपचार केले जातात. उपचाराअभावी एकही जनावर मृत्यूमुखी पडलेले नाही.
000
No comments:
Post a Comment