मुंबई, दि. 29 : भंडारा जिल्ह्यातील तुमसर
मतदार संघाचे माजी विधानसभा सदस्य सुभाषचंद्र नारायणराव कारेमोरे यांच्या
निधनाबद्दल विधानसभेत सर्व सदस्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सुभाषचंद्र कारेमोरे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून त्यांच्याबद्दल
शोकभावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, सुभाषचंद्र कारेमोरे हे काँग्रेसच्या
तिकीटावर 1978, 1980 आणि 1990 मध्ये तुमसर मतदार संघातून
निवडून आले होते. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अनेक ठिकाणी शिक्षण संस्था
सुरु करुन शाळा सुरु केल्या. तसेच आदिवासी आणि विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी
सातत्याने विधानसभेत आवाज उठविला. ते भंडारा तेली समाज संघटनेचे अध्यक्ष होते.
त्यांचा विविध सामाजिक संघटनांशी संबंध होता.
यावेळी सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार,
गणपतराव देशमुख, एकनाथ शिंदे यांनी आपल्या
शोकभावना व्यक्त करुन कारेमोरे यांना श्रद्धांजली वाहिली.
000
No comments:
Post a Comment