Wednesday, 28 November 2018

नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा लवकरच बसविणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

 मुंबई, दि. 28 : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्करोग उपचारासाठीच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याविषयीचा सर्वंकष प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे. या संस्थेस कर्करोग उपचाराच्या अनुषंगाने 25 कोटी रुपयांची यंत्रसामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या ठिकाणी सर्व यंत्रसामुग्री बसविण्याची कार्यवाही करण्यात येईलअसे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिले.
            सदस्य सुधाकर कोहळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटीलविरेंद्र जगतापडॉ. सुनील देशमुखसुनील केदार यांनी सहभाग घेतला.
0000

No comments:

Post a Comment