Wednesday, 28 November 2018

महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात अभिवादन




मुंबई दि. 28 : महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज विधानभवन येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढेविधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलवित्त मंत्री सुधीर मुनगंटीवारशिक्षणमंत्री विनोद तावडे,सहकार मंत्री सुभाष देशमुखसामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेआदिवासी विकास मंत्री विष्णू सवराजलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदेपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरपदुम मंत्री महादेव जानकरपरिवहन मंत्री दिवाकर रावतेसामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावारपदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकरसहकार राज्यमंत्री दादा भुसेकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतगृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकरमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणविधीमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्यासह विधीमंडळाच्या दोनही सभागृहाचे सदस्य यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानभवन येथील अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment