मुंबई, दि. 28 : राज्य विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज सभागृहात केली. त्यानुसार आवश्यकता भासल्यास शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर 2018 रोजी मतदान घेतले जाणार आहे.
या निवडणुकीसाठीची नामनिर्देशनपत्रे गुरुवार दि. 29 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11.45 वाजेपर्यंत विधानमंडळाचे प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करावयाची आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रधान सचिव यांच्या दालनात गुरुवार दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत होईल.
त्यानुसार उमेदवारी माघारी घ्यावयाची असल्यास त्याबाबतची लेखी सूचना प्रधान सचिवांकडे शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत स्वत: उमेदवाराने किंवा त्याच्या अनुमोदकाने आणून देणे आवश्यक आहे. निवडणुकीची आवश्यकता भासल्यास शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1 वा या वेळेत विधानसभा सभागृहात मतदान होईल. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता सभागृहाची बैठक पुन्हा सुरु होईल.
नामनिर्देशनपत्रे आणि उमेदवारी मागे घेण्याच्या सूचनेच्या प्रती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या 11 व्या मजल्यावरील ‘अ’ कक्षात मिळतील, असेही यावेळी अध्यक्षांनी घोषित केले.
0000
No comments:
Post a Comment