मुंबई, दि. 29 : सहायक मोटार वाहन निरीक्षक
यांना सेवेत घेण्याबाबतच्या उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणासंदर्भात सर्वोच्च
न्यायालयात शासनामार्फत सकारात्मक बाजू मांडली जाईल, असे
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केले.
सहायक मोटार वाहन निरीक्षक यांना सेवेत सामावून
घेण्याबाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली होती.
त्याला उत्तर देताना श्री. रावते बोलत होते.
यावेळी श्री. रावते म्हणाले, सहायक मोटार
वाहन निरीक्षक यांच्याबाबत उच्च न्यायालयाच्या उक्त दि. 28 सप्टेंबर 2018 च्या
आदेशावर सर्वोच्च न्यायालयात सर्व बाबी आणि मुद्दे सविस्तरपणे नमूद करुन विशेष
अनुमती याचिका दाखल करण्याचा तसेच शासनाच्यावतीने वरिष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे.
००००
No comments:
Post a Comment