Thursday, 29 November 2018

विधानसभा तारांकित प्रश्न क्र. 1 फ्यूचर मेकर दोषी आढळलल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील



मुंबई, दि. 29 :  उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील चैन मार्केटींगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक फ्यूचर मेकर या जैविक खते व औषधांची विक्री करणाऱ्या कंपनीने केल्याबाबत  शेतकऱ्यांची लेखी किंवा तोंडी स्वरुपात तक्रार प्राप्त झालेली नाही. फ्यूचर मेकर या कंपनीस राज्य व जिल्हा स्तरावरुन विक्रीचा परवाना दिलेला नाही. राज्यातील निरिक्षकामार्फत या प्रकरणाची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये मे फ्यूचर मेकर दोषी आढळले तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 
००००



No comments:

Post a Comment