मुंबई, दि. 3 : माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात प्रदूषण मुक्त दिवाळी या
विषयावर पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांची विशेष मुलाखत घेण्यात आली
आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 5 आणि
मंगळवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
प्रदूषण मुक्त
दिवाळीसाठी पर्यावरण विभागाचे नियोजन, पर्यावरण संरक्षणासाठी ग्लोबल वॅार्मिंगची जनजागृती, दिवाळीत हवेचे व
ध्वनीचे प्रदूषण फटाक्यांवर निर्बंध घालण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय, घनकचऱ्याचे
व्यवस्थापन,
लहान
मुलांचे फटाक्यांपासून संरक्षण, वाहन आणि कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण
थांबविण्यासाठी शासनाचे प्रयत्न तसेच शाळा माहाविद्यालयांच्या माध्यमातून प्रदूषणाबद्दल
जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम याबाबतची माहिती श्री. पोटे-पाटील यांनी
दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment