नागपूर,दि.13 : आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणीची वर मात करण्यासाठी अपर आयुक्त आदिवासी विभागाने शैक्षणिक योजना सहाय्यता कक्षाची स्थापना केली.
या कक्षामुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रवेश, निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, शैक्षणिक साहित्य,डी.बी.टी. शिष्यवृत्ती इत्यादी संदर्भात येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी कमी होईल, यासाठी अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात शैक्षणिक योजना सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली. काही अडचणी निमार्ण झाल्यास विद्यार्थ्यांनी 0712-2565008 किंवा swayamyojna@gmail.com येथे संपर्क साधावा. तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसंबंधी तांत्रिक अडचणी आल्यास 0712-2560773 किंवा nagpur.etribal@gmail.com यावर संपर्क साधून उपलब्ध सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर आयुक्त हषिकेश मोडक यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment