नागपूर,दि.13: पशुसंवर्धन योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2018- 19 करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या योजने अंतर्गत दुधाळ संकरित गायी म्हशीचे वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे यासाठी अर्ज करता येईल.
लाभार्थी हा सर्वसाधारण अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा. अर्ज 15 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने करावा. योजनेची संपूर्ण माहिती https:/mahabms.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर एसएमएस केला जाईल,असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
Shrikrashan pandit sangshette
ReplyDelete