* खेळाडूच्या सुविधेत वाढ
* आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळासाठी सुविधा
* आकर्षित स्टेडियम, सुशोभित परिसर
नागपूर
दि. 4 : मानकापुर येथील विभागीय क्रीडा
संकुलाच्या परिसरासह मुख्य स्टेडियममध्ये आवश्यक सुधारणासह केलेल्या नुतनीकरणानंतर
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या
नुतनीकरण व सुशोभिकरणामुळे येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनासाठी
क्रीडा संकुल नव्या स्वरुपात सज्ज झाले आहे.
मानकापुर येथे बांधण्यात आलेल्या विभागीय क्रीडा
संकुलामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य
दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी प्रशिक्षणात्मक साहित्य-सुविधा येथे उपलब्ध
करण्यात आली आहे. या विभागीय क्रीडा संकुलाचे बांधकाम मागील दशकापुर्वी झाले होते.
खेळाडुंना अधिक चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक
बांधकाम विभागातर्फे भारतीय रस्ते महासभेच्या अधिवेशनानिमित्ताने विविध विकास कामे
पुर्ण केली आहेत. यामध्ये इंडोअर स्टेडियमच्या नुतनीकरणाचाही समावेश आहे. नुतनीकरणाचा
शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
विभागीय क्रीडा संकुल येथे इंडोअर
स्टेडियममध्ये सात हजार प्रेक्षक बसु शकतील अशी सुविधा असून दहा बॅडमिंटन कोर्ट, जिम्नास्टीक,
व्यायामशाळा, बॉक्सिंग, टेबलटेनिस आदी सुविधा असून येथे दोन हजार खेळाडू नियमित
लाभ घेतात. क्रीडा संकुलामध्ये एशियन बॅडमिंटन, चॅम्पियनशिप, सिनिअर बॅडमिंटन
चॅमपियनशिप यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुध्दा आयोजित करण्यात येतात. क्रीडा
संकुलातील वातानुकुलीत क्षमतेत वाढ करणे, बॅडमिंटन, ॲकास्टीक नवीन पॅनल बसविणे, खेळाडूंसाठी
प्रसाधन गृह तसेच जिम्नॅशियम हॉलचे नुतनीकरणासाठी महत्त्वाचे कामे पुर्ण
झाल्यामुळे या स्टेडियमला नविन स्वरुप मिळाले आहे.
इंडोअर स्टेडियमसह परिसरातील विकास
कामांमध्ये वृक्षारोपणसह सुशोभिकरण करण्यात आल्यामुळे या परिसरातच्या सौंदर्यात भर
पडली आहे. बाहेरील सर्व मैदानाची दुरुस्ती केल्यामुळे फुटबॉल, सॉफ्टबॉलचा नियमित
सराव करणे शक्य झाले आहे. त्यासोबतच खेळाडूंसाठी कायमस्वरुपी प्रसाधन गृह,
स्टेडियममध्ये व बाहेरसुध्दा पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यात आली
असून मुख्य प्रवेशव्दारावर फोटो गॅलरी तयार करण्यात आली आहे. स्टेडियमला न्यु लुक
देताना आकर्षक रंगसंगती व सजावट पुर्ण करण्यात आली आहे. या नुतनीकरणाच्या कामामुळे
विभागीय क्रीडा संकुलाच्या सुविधांमध्ये वाढ झाली असून आंतरराष्ट्रीयस्तरावरील
स्पर्धा आयोजनासाठी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
विभागीय क्रीडा संकुलाच्या
नुतनीकरण व सुशोभिकरणाच्या कामासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजिव कुमार, जिल्हाधिकारी
अश्विन मुदगल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्या
मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. सर देशमुख,
कार्यकारी अभियंता जनार्धन भानुसे, उपविभागीय अभियंता अनिल देशमुख, चंद्रशेखर
गिरी, श्री. शंकरापुरे, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी
अविनाश पुंड यांनी सुशोभिकरण व नुतनीकरणाची कामे पुर्ण केली आहेत.
*****







No comments:
Post a Comment