· छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७
· पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
नागपूर दि. २६, राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गंत “एकवेळ
समझोता योजना” राज्यातील लाभार्थी पात्र शेतक-यांना कर्जमाफी व नियमित परतफेड करणा-या
शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम आता 31 मार्च २०१९ पर्यंत बँकेत जमा
करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतक-यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन
जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे.
छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गंत पात्र व लाभार्थी शेतक-यांना प्रेात्साहन
पर लाभ देण्यासाठी २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आलेली आहे.
राज्यातील लाभार्थी पात्र शेतक-यांना कर्जमाफी व नियमित परतफेड करणा-या शेतकऱ्यांना
त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत होती. मात्र
आता १९ डिसेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्यासाठी
जे पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत, त्यांनी संबंधित बँकेशी
संपर्क करुन एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment