·
राज्यातील
40 लाख स्पर्धकांचा सहभाग
नागपूर दि. 22, मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विविध
खेळांना प्रोत्साहन देण्यात येत असून, या स्पर्धांसाठी राज्यातील 40 लाख
स्पर्धकांनी नोंदणी केली असून, ही स्पर्धा देशातील सर्वात मोठी स्पर्धा असल्याचे
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नरेंद्रनगर येथील मैदानावर दक्षिण-पश्चिम मंडळातर्फे सीएम
चषक शेतकरी सन्मान क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन विविध मंडळाच्या स्पर्धकांचा उत्साह वाढविला. यावेळी
आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. परिणय फुके, माजी महापौर प्रवीण दटके, प्रा. राजीव
हडप, तसेच नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षिण - पश्चिम मंडळातर्फे
आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषक शेतकरी सन्मान स्पर्धेसाठी राज्यात सर्वाधिक 11
हजार 233 स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. सीएम चषक क्रीडा स्पर्धेत पुरुषांचे 70 तर
महिलांचे 14 कबड्डी संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धा 26 डिसेंबरपर्यंत सुरु
राहणार असून, रविवारी नागपूर ग्रामीणमधील 45 संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील कबड्डी
संघांच्या खेळाडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्यात. प्रारंभी
आशिष पाठक, संजय पौनीकर, श्रीकांत दुचक्के, श्रीमती जयश्री वाडीभस्मे, नानाजी कदम
आदिंनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
यावेळी आयोजन
समितीचे अध्यक्ष रमेश भंडारी, नगरसेवक संदीप गवई, श्रीमती विशाखा मोहोड, भूषण
केसकर तसेच दक्षिण –पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment