Saturday, 22 December 2018

माजी आमदार कृष्णराव पांडव यांना श्रध्दांजली


नागपूर दि. 22, माजी आमदार कृष्णराव पांडव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  त्यांच्या धंतोली येथील निवासस्थानी जावून श्रध्दांजली वाहिली.
     माजी आमदार कृष्णराव पांडव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, त्यांनी नगरसेवकापासून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली असून त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णराव पांडव यांच्या पार्थिवावर गुलाबपुष्प अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, माजी महापौर प्रवीण दटके आदि उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  गिरीश व किरण पांडव यांचे सांत्वन केले.
                                          *******

No comments:

Post a Comment