मुंबई,दि.24: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात
‘राज्यातील
ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन’ याविषयी राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत प्रसारित
होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून मंगळवार दि.25 आणि बुधवार
दि.26
डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी
ही मुलाखत घेतली आहे.
पुरातत्व विभागाच्या स्थापनेमागचा उद्देश, महाराष्ट्रातील संवर्धनाच्या
दृष्टीने महत्वाची अशी ऐतिहासिक स्थळे आणि त्यांच्या जतन व संवर्धनाचे कार्य, पुरातन
वास्तूचे वय जाणून घेण्याकरिता करण्यात येणाऱ्या चाचण्या, जोखमीच्या ठिकाणी संवर्धनाचे
कार्य करताना घ्यावयाची काळजी, पुरातन वस्तूंच्या संवर्धनासाठी घ्यावयाची काळजी, पुरातत्व
विभागात रोजगाराच्या संधी तसेच विभागाला संपर्क साधायचा असल्यास संपर्क क्रमांक
याविषयीची सविस्तर माहिती डॉ.श्री.गर्गे
यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
0 0 0
No comments:
Post a Comment