Wednesday, 2 January 2019

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य लाभार्थी म्हणतात.., होय… हे माझे सरकार…!

 नागपूर, दि.०२ : प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरीब आणि होतकरुंना मिळालेल्या घरकुल योजनेमधील नागपूर ग्रामीणमधून  आठ, शहरमधून पाच, शबरी घरकुल योजनेमध्ये एक, नागपूर शहरातील घरकुल पट्टेवाटप तीन आणि निर्वासितांसाठी घरकुल मालकी हक्क पट्टेवाटपमधून दोन अशी  एकूण  19 लाभार्थ्यांशी आज लोकसंवाद’ या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यामुळे घरकुल मिळाल्याच्या आनंदासोबतच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधता आल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
              
घरकुलामुळे मिळाला आधार - दर्शना सोलंकी

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील खैरी (बिजेवाडा) येथील दर्शना अमरसिंग सोलंकी यांना 2017-18 या वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ मिळाला आणि त्यांना घरकुलाच्या रूपाने एक भक्कम आधार मिळाला. 
            दर्शना सोलंकी या विधवा महिला खैरी (बिजेवाडा) येथील रहिवासी असून त्या हातमजुरी करून घर चालवितात. दहा वर्षाचा त्यांचा मुलगा आणि त्यापर्वी मातीच्या साध्या घरात रहात असत. कच्च्या घरामुळे सहाजिकच खूप अडचणी येत असत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळतो ही माहिती दर्शना सोलंकी यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली.
एसईसीसी डाटामधून ग्रामसभेतून त्यांची या योजनेचा लाभ मिळण्यासाठी निवड झाली. पंचायत समितीजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फतच्या सर्व्हेमध्ये त्यांची माहिती घेण्यात आली व निवड करण्यात आली. त्यानंतर दर्शना सोलंकी यांना घरकुल मंजूर झाले. योजनेच्या विहित नियमांनुसार त्यांना अनुदानाची लाख 20 हजार रूपये रक्कमही थेट बँक खात्यात मिळाली. 'एमजीनरेगाअंतर्गत 16000 रूपये. मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आले आणि दर्शनाताईंचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले. पूर्वी मातीच्या साध्या घरात राहणाऱ्या दर्शनाताई यांना घरकुलामुळे आता खूप आधार वाटतो आहे. असे आवर्जून सांगितले. दर्शना सोलंकी यांच्या घरात पर्वीपासूनच गस कनेक्शन आहे. घरातील शौचालयाचे कामही 2018 मध्ये पूर्ण झाले असून शौचालयाचा वापरही करण्यात येतो.
            घरकुलाच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाबाबत दर्शनाताई म्हणाल्या, "पूर्वी मातीच्या घरात पावसाळ्यात पाणी गळणेथंडीत गारठा आणि उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होत असे. पण प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत घरकुलामुळे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आणि हा सगळा त्रास संपला. पक्क्या घरकुलामुळे आधार मिळाला आहेसुरक्षित वाटते आहे. आता मी आणि माझा मुलगा समाधानाने रहात आहे." एका खऱ्या खुऱ्या गरजूला घरकुलामुळे आधार आणि सुरक्षितता मिळालीआणि योजनेचा उद्देश सफल झाला. 

                                                                                           घराचे स्वप्न पूर्ण झाले  - नवसी पवार
        भिवापूर तालुक्यातील शिवणगांव तांडा येथील  नवसी  पवार या महिलेला राहायला पक्के घर नव्हते. एक मुलगा व मुलगी आणि पतीसोबत कच्च्या मातीच्या घरात राहत होतो. मात्र दरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती गावातील ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांकडून मिळाली. त्याचा ऑनलाईन अर्ज केला. आता घरकुलासोबतच उज्ज्वला गॅस योजना आणि शौचालयाचे अनुदानही थेट खात्यात जमा झाल्याचे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. आम्हाला पक्के घर मिळाल्यामुळे सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असून, खूप आनंद झाल्याचे सांगातना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्रीमती पवार आभार मानतात.
शासनाचा पारदर्शी कारभार - तायाबाई चौधरी
    कळमना येथील तायाबाई चौधरी यांनी मातीच्या घरात राहताना खूप त्रास व्हायचा. पावसाळ्यात जागोजागी घरात पाणी गळायचे. मुलांना अभ्यासही करता येत नसे. इतरांची पक्की घरे बघून मुले आपल्याला पक्के घर का नाहीम्हणून सतत प्रश्न विचारायची. मात्रप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे घर मिळाल्याचे सांगतात. तसेच हे घराचे बांधकाम करताना कोणतेही पैसे द्यावे लागले नाहीत. वेळावेळी त्यासाठीचा निधीचा धनादेश‍ मिळत असल्यामुळे हे शासन पारदर्शी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे किती आभार मानू  - यशोदाबाई आखरेअरोली

     जन्म झाल्यापासून कच्च्या मातीच्या घरात राहत आलो आहोत. मातीच्या घरात खूप त्रासलो होतो. मात्रप्रधानमंत्री आवास योजनेतून मला सिमेंटचे पक्के घर मिळाले आहे. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे किती आभार मानूअसे अरोलीच्या लाभार्थी श्रीमती यशोदाबाई आखरे आपल्या भावना व्यक्त केल्या.
        भारत पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान पाकिस्तानातून नागपुरात मोठ्या प्रमाणावर सिंधी समाज विस्थापित झालेला आहे. जवळजवळ गेल्या ७० वर्षांपासून हा सिंधी समाज मनाशी निर्वासितांचे दु:ख  घेऊन जगत होता. आतापर्यंत कितीतरी राज्य शासन आलेगेले. मात्र नागपुरातील सिंधी समाजाचे दु:ख कोणीही समजून घेतले नव्हते. फाळणीनंतर नुकसान भरपाई म्हणून एक छोटे घर दिले होते. त्या घराची मालकी ही राज्य शासनाची होती. मात्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्हाला गेल्या महिन्यात त्या जागेची मालकी मिळाली. आता आम्हाला स्वत:च्या घरात राहत असल्याचा आनंद मिळत असल्याच्या भावना  श्री. गिरीश जेसवानी यांनी व्यक्त केल्या.
आम्ही भारताचे नागरिक - प्रकाश रामचंदानीजरीपटका

        फाळणीनंतर आम्ही नागपुरात आलो. तेव्हापासून स्वत:च्या मालकीचे घर नसल्याची मनात एक सल होती. गेल्या निवडणुकीत आपण‍ निवडून आलात. त्यानंतर आशेचा किरण निर्माण झाला. सिंधी समाजबांधवांना गेल्या महिन्यात त्यांच्या मालकीचे पट्टे मिळाले. आता आम्ही भारताचे नागरिक असल्याचा आनंद मिळतोयअसे जरीपटका येथील रहिवाशी प्रकाश  रामचंदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
१८ वर्षांनंतर मालकी पट्टयाची मागणी पूर्ण झाली- बुधाजी सुरकर

        सन २००० पासून धंतोली परिसरात राहणारे बुधाजी  सुरकर यांनी मालकी पट्टे मिळावेत अशी वारंवार मागणी केली होती. मात्र ती मागणी डिसेंबर २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पूर्ण झाली आहेअसे सांगताना बुधाजी सुरकर यांना काही वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने त्यांचे अतिक्रमीत घर पाडून बेघर केल्याची आठवण सांगतात. मात्रत्यावेळी तत्कालीन आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाकडे जावून ही प्रक्रिया थांबवत दिलासा दिल्याची  आठवण सांगतात.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मालकी पट्टे मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकसंवाद कार्यक्रमात आभार मानले.
    यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगलनिवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजीम्हाडाचे मुख्य अधिकारी संजय भिमनवार, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डी. एन. चव्हाण,  प्रधानमंत्री आवास योजनेचे श्री. मकरंद नेटकेजिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, श्रीमती लीना बुधेआदी उपस्थित होते.   
                                                                   ****

No comments:

Post a Comment