· यंदापासून
प्री-आयएएस कोचींग सेंटरमध्ये नवा उपक्रम सुरु
·
अधिक चौकशीसाठी
दूरध्वनी क्र. 0712-2565626 व
·
भ्रमणध्वनी
क्र.9960936237 वर संपर्क साधावा
नागपूर,दि.01
: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (युपीएससी) परीक्षांमध्ये
मराठी टक्का वाढावा, या उद्देश्याने लवकरच नागपूर येथे
अंदाजे 14 व 15 जानेवारीदरम्यान अभिरुप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी
माहिती भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे (प्री-आयएएस कोचींग सेंटर)
संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी दिली. जिल्हा माहिती
कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘माध्यम संवाद’ कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.
युपीएससीची मुख्य परीक्षा
उत्तीर्ण झालेला आणि महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कोणताही उमेदवार या अभिरुप
मुलाखतीला उपस्थित राहून मार्गदर्शन मिळवू शकेल. त्यासाठी तो प्री-आयएएस कोचींग
सेंटरचा उमेदवार नसला तरी चालेल, असे सांगून संचालक श्री. लाखे यांनी केंद्रीय नागरी परीक्षेतून
मराठी टक्का वाढावा, हा मुख्य हेतू या अभिरुप मुलाखती घेण्यामागे असल्याचे स्पष्ट केले.
राज्यात असे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर आणि नाशिक असे
सहा प्रशिक्षण केंद्र असून, एकट्या नागपुरातील केंद्रामधून आजपर्यंत 101 उमेदवार शासनसेवेत दाखल
झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे या केंद्रामधून
परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना 11 महिन्यांच्या
कालावधीमध्ये विविध विषयतज्ञांचे मार्गदर्शन लाभते. तसेच त्यांना या कालावधीत
पूर्वीच्या 2 हजार रुपयांवरुन 4 हजार रुपये विद्यावेतनही दिले जाते, असेही डॉ. लाखे यांनी
सांगितले.
सन 2015 पर्यंत या केंद्रात केवळ 60 उमेदवारांना परीक्षा पूर्व
प्रशिक्षण देण्याची मर्यादा होती. मात्र, 2015 नंतर त्याच्या मर्यादेत 120उमेदवारांपर्यंत वाढ करण्यात आली
आहे. त्यात सन 2011 पासून 10 अल्पसंख्याक, व सन 2016 पासून 10 बार्टी (अनुसूचित जाती) असे एकूण 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला
जातो. आजपर्यंत या केंद्रातून 13 आयएएस, 11 आयपीएस, 2आयएफएस, 2 भारतीय वनसेवा आणि इतर अनुषंगीक सेवांमध्ये 73 अधिकारी सेवा बजावत असल्याचे
श्री. लाखे यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय स्तरावर भारतीय
प्रशासकीय सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या नागपुरातील
उमेदवारांचे प्रशासनातील प्रतिनिधीत्व वाढावे. त्यांच्यातील वैयक्तिक त्रुटी दूर
करणे, सामाजिक विषयांना
अद्ययावत करणे, तथा युपीएससी उमेदवारांना गुणात्मक प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने
या संस्थेत सत्र 2018च्या तुकडीपासून संस्थेतर्फे अभिरुप मुलाखत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. संस्थेतून 2018ची मुख्य परीक्षा उतीर्ण झालेले विद्यार्थी व
संस्थेशी संबंधित नसणारे परंतु, नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले बाहेरील विद्यार्थीही
यात सहभागी होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी www.preiasnagpur.org.in या संकेतस्थळावर सविस्तर
माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या अभिरुप मुलाखतीसाठी जानेवारी 2019 च्या तिसऱ्या आठवड्यात
घेण्यात येईल. त्यामुळे संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी चौकशीसाठी
केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६५६२६ आणि भ्रमणध्वनी ९९६०९३६२३७ या वर
संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
यापूर्वी अशा प्रकारच्या मुलाखती
मुंबई येथील प्री-आयएएस कोचींग सेंटर आणि दिल्ली येथील जुन्या महाराष्ट्र सदनात
आयोजित केल्या जात होत्या. मात्र, नागपुरातून यावर्षीपासून हा नवीन उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी
सांगितले.
राज्यातील अनेक उमेदवार
मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीची तयारी करण्यासाठी पुणे, मुंबई आणि दिल्ली या
शहरांमध्ये जात असत. त्यामध्येही तेथील कोचींग क्लासेसचे शुल्क वेगवेगळे, शिवाय तिथे राहण्याचा खर्च
सर्वसामान्य मुलांला परवडेलच असे नाही. त्यामुळे मराठी उमेदवारांची ही अडचण दूर
करुन त्यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न अभिरुप मुलाखती घेऊन सोडवता
येणार आहेत,
त्यातून
मराठी उमेदवारांचे युपीएससीमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण नक्कीच वाढेल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
******
No comments:
Post a Comment