Tuesday, 1 January 2019

कादर खान यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई, दि. 1 ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाने आपल्या सहज अभिनय आणि संवाद लेखनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटविणारा कलाकार हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, कादर खान यांनी अभिनयासोबतच पटकथा आणि संवाद लेखनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतून घेतलेले अभियांत्रिकीचे शिक्षण, प्राध्यापकी आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीकडे वळलेल्या कादर खान यांचा जीवनानुभव समृद्ध होता.  विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या होत्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलावंत हरपला आहे.

No comments:

Post a Comment