मुंबई, दि. 1 : हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथालेखक आणि दिग्दर्शक कादर खान यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
कादर खान यांनी अनेक सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या असून उत्तम दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केले आहे. त्यांच्या विनोदी भूमिका रसिकांमध्ये अधिक लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील नवीन पिढीमध्ये पोकळी निर्माण झाली असून हिंदी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
0 0 0
No comments:
Post a Comment