नागपूर
दि. 6 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोरेशन लिमीटेडव्दारे आयोजित रहाटे कॉलनी ते अजनी
रेल्वे स्टेशन पर्यतच्या डी.पी. रोडचे भुमीपूजन व अजनी रेल्वे स्टेशन परिसरातील
इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाच्या कामाचे भुमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते
झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मेट्रोचे
व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत उपस्थित होते.
राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणाच्या भारतमाला उपक्रमांतर्गत अजनी रेल्वे स्टेशन परिसरात इंटर
मॉडेल स्टेशन उभारण्यात येणार आहे. 1288 कोटी रूपयांच्या या प्रकल्पामुळे रेल्वे, मेट्रो व बस वाहतूक एकत्रित करण्यात येणार आहे. देशातील हा
पहिल्याच पध्दतीचा प्रयोग असणार आहे. यावेळी या प्रकल्पाची सविस्तर माहिती
मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षीत यांनी यावेळी दिली.
००००
No comments:
Post a Comment