Wednesday, 6 March 2019

संविधान उद्देशिकेच्या शिलालेख कार्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन



        नागपूर, दि. 6 : संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात संविधान उद्देशिका शिलालेख उभारण्यात येणार आहे. संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. तत्पूर्वी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते आदरांजली वाहण्यात आली.
            यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
            संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात संविधान उद्देशिका शिलालेखाचे कार्य येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. या शिलालेखासाठी 23 लाख रुपयाचा निधी खर्च होणार आहे. संविधान उद्देशिका शिलालेखाची उंची सुमारे 18 फूट राहणार असून या स्मारकाचे बांधकाम पिवळ्या व लाल सॅन्ड स्टोनमध्ये करण्यात येईल. यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पॉली मार्बल दगडावर कोरलेली असेल. या स्मारकाची प्रतिकृती संसद भवनाप्रमाणे राहील, अशी माहिती नगरसेवक संदीप जाधव यांनी यावेळी दिली.
००००

No comments:

Post a Comment