मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’
कार्यक्रमात ‘कशी कराल स्पर्धा परीक्षेची
तयारी’ या विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्रा. मीनल
मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या
सर्व केंद्रावरून गुरुवार दि. 28, शुक्रवार दि. 29, शनिवार दि. 30 मार्च आणि सोमवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित
होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या
परीक्षेला कधी सुरुवात करावी, या परीक्षांचा बदललेला अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात कधी करावी, सराव
चाचण्यांचे महत्व आदी विषयांची माहिती श्रीमती मापुस्कर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment