नागपूर, दि.27 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019च्या आज बुधवार रोजी नागपूर व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक अशी दोन उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असल्याची माहिती संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघ येथून श्रीमती पल्लवी नंदेश्वर - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून तारका देविदास नेपाले - अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या गुरुवार दि. 28 मार्च ही शेवटची तारीख आहे.
*******
No comments:
Post a Comment