Monday, 1 April 2019

जात पडताळणी अर्जासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ


नागपूर, दि. 1: इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत सन 2018-19 शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव समितीकडे सादर केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना समितीच्या वतीने आणखी एक संधी देण्यात येत आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यात (Online) अर्ज, आवश्यक दस्तऐवज तसेच इयत्ता 12 वी ची परीक्षा प्रवेश पत्र, MHT-CET,JEE व NEET या सारख्या प्रवेश पात्रता परीक्षेकरीता भरण्यात आलेल्या अर्जाची पोच पावतीसह दिनांक 30 एप्रिल 2019 पर्यंत आपले जात पडताळणीचे प्रस्ताव संबंधित महाविद्यालयामार्फत किंवा प्राचार्याच्या सही शिक्क्यासह कागदपत्रे तयार करावीत. सर्व कागदपत्रासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 2रा माळा, विंग बी, शासकीय आय.टी.आय. समोर, दिक्षाभूमी रोड, नागपूर -440022 या कार्यालयात विहित कालावधीत सादर करावा. मुदतीनंतरचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य आर.डी.आत्राम यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment