Tuesday 4 June 2019

सत्र 2019-20 साठी आर. टी. ई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ

प्र. प. क्र. 387                                                                                                                           


                                                          
नागपूर, दि. 4 : शिक्षण हक्क कायद्यान्वये जिल्ह्यात वंचित घटकातील व दुर्बल घटकातील बालकांसाठी 25 टक्के प्रवेशांतर्गत सन 2019-20  करिता प्रवेश देणे सुरु आहे. दुसऱ्या सोडतीसाठी पालकांना अर्ज दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात येत असून पालकांना त्यांच्या अर्जात काही त्रुटी झाल्या असल्यास  त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी  दिनांक 5 ते 7 जून 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ज्या पालकांनी अर्ज भरला परंतु कन्फर्म (comfirm) केला नाही तो कन्फर्म (comfirm) करणे, ज्या पालकांना लॉटरी लागली नाही अशा पालकांनी त्यांचे गुगल लोकशेन(google location) दुरुस्त करुन शाळांची निवड नव्याने करणे आवश्यक आहे. तथापि त्यांना नावात व जन्मतारखेत बदल करता येणार नाही, ज्या पालकांना प्रथम फेरीत लॉटरी लागली परंतु अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेवू शकले नाही अशाच तक्रारींची खात्री पडताळणी समितीने करणे व पालकांची चूक किंवा तांत्रिक चूक असल्यास गुगल लोकेशन (google location)  व शाळा निवडीत दुरुस्ती करणे, ज्या पालकांनी घराचे अंतर जाणीवपूर्वक 1 किलोमीटर च्या आत दाखविले आहे व अशांना पडताळणी समितीने अपात्र ठरवले आहे अशांची दुरुस्ती करता येणार नाही.
अर्ज दुरुस्तीसाठी पालकांना तालुका पडताळणी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज अनकन्फर्म (Uncomfirmed) करुन घेणे आवश्यक राहील. त्यानंतरच पालकांना अर्जात दुरुस्ती करता येईल. सर्व शाळा आणि पालकांनी आरटीई प्रवेशासंबंधी दिलेल्या मुदतवाढीची दखल घ्यावी व  या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद चिंतामण वंजारी यांनी पालकांना केले आहे.
***

No comments:

Post a Comment