Tuesday 4 June 2019

विविध प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिराचे आयोजन

प्र. प. क्र. 386                                                                       
                    
                                                          
नागपूर, दि. 4 : शपथपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वय, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्राकरिता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक 8 व 9 जून 2019 आणि 22 व 23 जून 2019 रोजी खाली दिलेल्या शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सकाळी 10 ते 4 या वेळात शिबिराचे आयोजन केले आहे.
शाळा व महाविद्यालयांचे नावे खालीलप्रमाणे आहेत :
तिडके विद्यालय, काटोल रोड, आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी,  गजानन विद्यालय, अयोध्या नगर, दादासाहेब धनवटे विद्यालय, महाल, महात्मा गांधी सेन्टेनिअल हायस्कूल, जरीपटका, नागपूर या विद्यालयात दिनांक 8 व 9 जून या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच रामनगर भारत विद्यालय, रामनगर, पंडित बच्छराज व्यास विद्यालय राजाबक्षा मेडिकल कॉलेज, संताजी महाविद्यालय, न्यू स्नेहनगर, राजेन्द्र हायस्कूल, हसनबाग रोड, जिंगल बेल कॉनव्हेंट हिवरीनगर, नागपूर येथे दिनांक 22 व 23 जून रोजी शिबिराचे आयेाजन केले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार शपथपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वय, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्रासाठी अर्ज आवश्यक कागदपत्रासह सादर करता येईल.
नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी 8 व 9 तसेच 22 व 23 जून रोजी आयोजित शिबिरास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
***

No comments:

Post a Comment