Tuesday, 19 November 2019

बारावीची 18 फेब्रुवारी, दहावीची परीक्षा 3 मार्चपासून

नागपूर, दि. 19 : राज्य मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इयत्ता 10 वी) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून यंदा 18 फेब्रुवारीपासून बारावीची तर 3 मार्च पासून दहावीची परीक्षा सुरु होणार आहे.
बारावीची सर्वसाधारण व्दिलक्षी विषय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची  18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा (पुर्नरचित अभ्यासक्रम) 3 ते 23 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे.
फेब्रुवारी - मार्च 2020 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांची सविस्तर अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी  माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयाकडून येणाऱ्या छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या वेळापत्रकाची खात्री करुन परीक्षेस प्रविष्ट व्हावे. तसेच विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपुर्वी राज्य मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल, अशी माहिती सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 
                                                                                                 *******

No comments:

Post a Comment