नागपूर, दि.19 : दिनांक 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी निवडणूकीकरिता नवनिर्मित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे, त्या सर्व उमेदवारांनी त्यांचे मूळ जात वैधता प्रमाणपत्र संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर यांच्या कार्यालयात दिनांक 20 ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत जमा करावे.
दिनांक 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत निवडणूकीसाठी उभे असलेल्या अर्जदारांना नवनिर्मित तत्कालीन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून सदर जात वैधता प्रमाणपत्र संबंधिताकडून मागवून ते जप्त करुन रद्द करण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यामुळे त्या प्रमाणपत्राचा यापुढे कार्यालयीन कामकाजासाठी उपयोग करता येणार नाही. तसेच ज्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची पुन्हा आवश्यकता असल्यास त्यांनी त्यांचे मूळ जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे जमा करावे. यावेळी ते ज्या जातीचे आहे, त्या जातीच्या प्रवर्गानुसार मानीव दिनांकापूर्वीचे जातीचे, रहिवासी पुरावे मूळ कागदपत्रासह समितीकडे फेरपडताळणीकरिता अर्ज करावा. जेणेकरुन त्यांना फेरतपासणी करुन नव्याने जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करता येईल, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य आर.डी. आत्राम यांनी दिली आहे.
*******
No comments:
Post a Comment