Monday, 18 November 2019

दुसऱ्या राष्ट्रीय जलपुरस्कारासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठवावेत


            मुंबईदि. 18 : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयजलसंपदानदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्या मार्फत जलसंधारण संदर्भात जनजागृतीस प्रोत्साहन देण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रीय जलपुरस्कार 2019 ची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय जलपारितोषिके हे उत्कृष्ट राज्यजिल्हानगरपालिका, पंचायत समितीगाव, ग्रामपंचायतशाळादूरचित्रवाणीवरील कार्यक्रमवर्तमानपत्र इत्यादींना देण्यात येणार आहेत.
            पुरस्कार निवड निकषानुसार राज्य शासनामार्फत जल वापरासंदर्भात निगडीत असलेल्या जलसंपदाजलसंधारणकृषीउद्योग विभागामार्फत या क्षेत्रात करण्यात आलेल्या विशेष कार्याची माहिती, चित्रफीत (व्हिडिओ) याचा समावेश असणारा सर्वसमावेशक प्रस्ताव दि. 19 नोव्हेंबर 2019 पर्यंत विभागास सादर करावा. तसेच राष्ट्रीय जल पारितोषिकांपैकी उत्कृष्ठ राज्य’ या पुरस्कारासाठी जलसंपदाजलसंधारणकृषीउद्योग विभागाच्यावतीने राज्य शासनामार्फत दि. 30 नोव्हेंबर 2019 पूर्वी प्रसताव पाठवावेततसेच अन्य विषयासंदर्भातील पारितोषिकांसाठी संबंधित विभागाने त्यांचे प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयास परस्पर पाठवावेअसे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment