Monday, 18 November 2019

सृष्टी मित्र पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित


        नागपूर, दि. 18: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी हाती घेतलेल्या पर्यावरणपूरक व पर्यावरणसंवर्धक कृती उपक्रमातील प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरण विभागातर्फे ‘सृष्टी मित्र पुरस्कार’ दरवर्षी देण्यात येतो.
            पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे यांच्या वतीने या पुरस्काराचे व्यवस्थापन करण्यात येते. या पुरस्काराचा मुख्य उद्देश विद्यार्थी आणि नागरिकांनी घेतलेल्या या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.  यासाठी ‘सृष्टी मित्र पुरस्कार-2019-20’ करिता प्रवेशिका मागविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन पर्यावरण शिक्षण केंद्राचे कार्यक्रम अधिकारी अमरनाथ करण यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment